मंत्रिमंडळातून के एस ईश्वरप्पा यांना बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी करत विधानसभेत कॉंग्रेस नेत्यांनी आपले धरणे आंदोलन सुरूच ठेवले, हा गदारोळ वाढत चालल्याचे निदर्शनास येतात सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी सभागृहाचे कामकाज मंगळवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत तहकूब केले आहे.

व्हॉइस : मंत्री ईश्वरप्पा यांच्या विरोधात काँग्रेस नेत्यांनी आंदोलन छेडत अहोरात्र धरणे आंदोलन सुरू केले आहे. सोमवारपर्यंत तहकूब केलेले विधानसभेचे कामकाज आज पुन्हा सुरू झाले. मात्र काँग्रेसचा गदारोळ पाहता सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी पुन्हा सभागृहाचे कामकाज मंगळवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत तहकूब केले आहे.
काँग्रेसचा गदारोळ सुरू असतानाच काही विधेयकाच्या दुरुस्त्या मांडून प्रस्ताव मंजूर करण्यात आले. यावेळी चौथे नागरी सेवा विधेयक मंजुर करण्यात आले आहे. यावेळी महसूल मंत्री आर. अशोक यांनी डिजिटल स्टॅम्प च्या वापरास मान्यता देण्याचा प्रस्ताव मांडला. आर एस एस आणि भाजपा विरोधात काँग्रेस नेते आरडाओरड करत होते. या गोंधळातच सभापतींनी डिजिटल स्टॅम्प ठरावावर शिक्कामोर्तब केले.
काँग्रेस सदस्यांनी आरएसएस विरोधात आरडाओरडा सुरू केल्यानंतर सभापतींनी आक्षेप घेतला सभागृहाचे कामकाज सुरू असताना आर एस एस ला विनाकारण चर्चेत का आणले जाते? आरएसएसचा या सभागृहात संबंध काय ? वारंवार वाद-विवाद या गोष्टीवरून करू नका असे सांगत सभापतींनी सभागृहाचे कामकाज उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत तहकूब केले आहे.


Recent Comments