Vijayapura

प्यार अंधा होता है, २ मुलांचा बाप असलेल्याशी प्रेमविवाह 

Share

 प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. त्यामुळेच मुलांचा बाप असलेल्यावर तिचे प्रेम जडले आणि त्यानेही तिच्याशी लग्न केले. पण संरक्षणाची मागणी करण्यासाठी एसपींकडे गेल्यावर पोलिसांनी त्या दोघांनाही ताब्यात घेतले. काय आहे हे प्रकरण? चला पाहू हा विशेष रिपोर्ट

होय, असे हातात हात घेऊन जाणाऱ्या या जोडीतील युवकाचे नाव सोमनिंग तर युवतीचे नाव अक्षता आहे. हे दोघेही विजापूर तालुक्यातील जालगेरी गावचे. या दोघांची लव्ह स्टोरी विचित्रच आहे. ड्रायव्हर असलेला सोमनिंग बीकॉम शिकलाय. त्यांच्या प्रेमाला प्रेम म्हणावे की केवळ एक आकर्षण समजत नाही. सोमनिंगचे लग्न होऊन त्याला पहिल्या पत्नीपासून २ मुलेही आहेत. विशेष म्हणजे अक्षताला हे माहित असूनही तिने त्याच्यावर प्रेम करून त्याच्याशी लग्न केले आहे. सोमनिंग आधी अक्षताच्या घरी कार चालक होता म्हणे. त्यावेळी तिला कॉलेजला विजापूर येथे सोडण्यासाठी तिच्या पालकांनी त्याला सांगितले. यावेळी या दोघांमध्ये प्रेमांकुर फुलला. या दोघांची ही प्रेमकहाणी गेली 6 वर्षे सुरु होती. त्यानंतर या दोघांनी गेल्यावर्षी 9 नोव्हेंबरला रजिस्टर मॅरेज केले. त्यामुळे या युवतीला तिच्या पालकांनी सोमनिंगच्या बाईकवरून कॉलेजला सोडण्यास सांगूनच चूक  केल्यासारखे झाले आहे. प्रेमाचे भूत कोणावर कसे सवार होते हेच सांगता येत नाही. 

अक्षताने मात्र आपल्या निर्णयाचे अजब समर्थन केले आहे. मी सोमनिंगवर प्रेम करून लग्न केले आहे. २ लग्न केल्याने काय चुकते? त्याच्या पहिल्या पतीसोबत ऍडजेस्ट करून मी जगेन असे तिने म्हटले आहे.

दरम्यान, प्रत्येक लव्हस्टोरीप्रमाणे या लव्ह मॅरेजला दोघांच्याही कुटुंबांनी विरोध केलाय. अक्षताने लग्नाला विरोध झाल्याने यापूर्वी २ वेळा आत्महत्येचा प्रयत्नही केला होता म्हणे. मी सोमनिंगवर प्रेम करते, त्याच्याशीच लग्न करणार आहे असे तिने पालकांना ठासून सांगितले होते. रजिस्टर मॅरेज करून हे दोघे  गोव्यासह अनेक राज्यात फिरून आले आहेत. कष्टाच्या पालकांनी ती हरविल्याची तक्रार पोलिसात दिल्यावर आपल्या जीवाला धोका आहे, आमचे रक्षण करा अशी विनवणी विजापूरच्या एसपींना केली. त्यावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन तिकोटा पोलीस ठाण्यात घेऊन गेले आहेत.

सोमनिंगने पहिल्या पत्नीला डायव्होर्सही दिलेला नाही. पण मला दोन्ही पत्नी पाहिजेत, पहिल्या पत्नीचे मन मी वळवेन असे तो सांगतो. पण त्याची पहिली पत्नी आणि दोन्ही मुले त्याच्या या लव्ह मॅरेजला मान्यता देणे कठीणच आहे. मात्र बहरण्याच्या वयात प्रेमाच्या मोहात पडून या युवतीने चूक केली आहे अशी लोकांमध्ये चर्चा आहे. विजापूरच्या विवाह नोंदणी कार्यालयात सोमनिंगने रजिस्टर मॅरेज करताना आपला पहिला विवाह झाल्याची माहिती दडवून ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र अक्षताच्या घरच्यांकडून धमकीचे फोन येत आहेत, आमचे रक्षण करा अशी विनवणी त्याने एसपींकडे केली आहे.

एकंदर, प्रेम करत असाल तर सावध व्हा असे कोणीतरी अशा युगुलांना पाहूनच म्हटले असावे. आता या विचित्र लव्ह स्टोरीवर पोलीस कसा तोडगा शोधतात? या लव्ह स्टोरीचा दि एन्ड काय होणार हे पाहणे कुतूहलाचे ठरणार आहे.

विजयकुमार सारवाड, आपली मराठी, विजापूर 

 

  

Tags: