कन्नड भाषा–संस्कृतीच्या रक्षणासाठी शाळा–महाविद्यालयांच्या विध्यार्थ्यांसाठी कन्न्डपर कार्यक्रम आयोजित केले जातील असे कन्नड साहित्य परिषदेच्या जिल्हाध्यक्षा मंगला मेटगुड यांनी सांगितले.

मुडलगी येथे कुरबिनहट्टी सहकारी पतसंस्थेत कसापच्या मुडलगी शाखेच्या नव्या पदाधिकाऱ्यांचे अधिकारग्रहण आणि साहित्यिक उपक्रमांचे उदघाटन केल्यावर त्या बोलत होत्या. प्रारंभी मुडलगी शहरात भुवनेश्वरी देवीच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी कसाप मुडलगी शाखेचे अध्यक्ष डॉ. संजय सिंदीहट्टी व नव्या पदाधिकाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बालशेखर बंदी, कसाप माजी जिल्हाध्यक्ष मोहन पाटील, डॉ. महादेव जेद्दीमनी, कामगार खात्याचे संयुक्त संचालक वेंकटेश सिंदीहट्टी, शिवलिंग अरगी, महावीर सल्लागोळ, चिदानंद हुगार आदी उपस्थित होते.


Recent Comments