Vijayapura

विजापुरात शिवजयंती उत्साहात

Share

विजापूर शहरात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९२ जयंतीनिमित्त आज विजापूर शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांनी विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजी राजांनी उभे केले. भारतातील अशा महान वीरपुरुषाची आज विजापूर शहरात तारखेनुसार मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.

शहरातील प्रतिष्ठित शिक्षण संस्था, छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण सोसायटी या नावे चालविली जाते. या संस्थेच्या माध्यमातून रवींद्रनाथ टागोर शाळा आणि महाविद्यालयात जयंतीचे आचरण करण्यात आले होते. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांच्या वेशभूषेत येऊन इतिहासाला उजाळा दिला. यावेळी विद्यार्थ्यांना उद्देशून शिवाजी गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगितला.

शिवजयंतीच्या निमित्ताने शाळा परिसर आकर्षक सजविण्यात आला होता. तसेच शाळा परिसरात रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. संस्थेचे अध्यक्ष शिवाजी गायकवाड यांनी मिठाईचे वाटप केले.

मध्यमवर्गीयांना शिक्षण देण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात वसंत गायकवाड, प्रशासनाधिकारी रिटा गायकवाड, महाविद्यालयाचे प्राचार्य जयराम, शिक्षक विद्याधर पाटील, गजानन, शिवराम आदींसह अनेकजण उपस्थित होते.

या कार्यक्रमानंतर मुलांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. शिवरायांनी केवळ हिंदू धर्मासाठी योगदान दिले नसून धार्मिक सहिष्णुता, सर्वधर्मसमभाव या भावनेने स्वराज्याची स्थापना केली. या अर्थानेच यावेळी एका गीताचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले.

हिंदवी स्वराज्याचे सवपन साकार करण्यासाठी इतिहास रचणाऱ्या थोर छत्रपती शिवरायांच्या जयंतीचे आचरण विजापूरमध्ये भव्य प्रमाणात करण्यात आले.

Tags: