बेळगावातील विजया पॅरामेडिकल कॉलेजमध्ये हिजाबवरून निर्माण झालेला वाद मिटण्याची चिन्हे दिसून येत नाहीयेत. आजसुद्धा विद्यार्थिनींनी हिजाब घालून कॉलेजसमोर निदर्शने सुरु ठेवल्याने प्राचार्य प्रकाश पाटील यांनी कॉलेजला बेमुदत सुटी घोषित केली.

होय, बेळगावातील विजय पॅरामेडिकल कॉलेजच्या मुस्लिम विद्यार्थिनी हिजाबसाठी असून बसल्या आहेत. गेल्या २ दिवसांपासून कॉलेजच्या गेटसमोर हिजाबला परवानगी देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या या विद्याथिनींनी आज तिसऱ्या दिवशीही निदर्शने सुरूच ठेवली. खुद्द जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ, प्राचार्य आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी समजूत घालूनदेखील विद्यार्थिनी आपल्या मागणीवर असून बसल्या आहेत. आज शनिवारी तिसऱ्या दिवशीही १५ विद्यार्थिनी हिजाब घालूनच कॉलेजला आल्या. त्यातील घरी गेलेल्या २ विद्यार्थिनी परत कॉलेजमध्ये आल्या. हायकोर्टाचा अंतरिम आदेश डिप्लोमा, पदवी कॉलेजला लागू पडत नाही, त्यामुळे हिजाब घालून वर्गात बसण्यास अनुमती द्या अशी मागणी करत त्या वर्गासमोरच त्यांनी धरणे धरली. निदर्शक विद्यार्थिनींची समजूत घालण्याचे सर्व प्रयत्न प्राचार्य अशोक पाटील यांनी केले. मात्र ते व्यर्थ ठरले. 
विद्यार्थिनींची समजूत घालण्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरल्याने अखेर जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढील आदेशापर्यंत प्राचार्य प्रकाश पाटील यांनी नाईलाजाने कॉलेजला बेमुदत सुटी जाहीर केली. या संदर्भात बोलताना प्राचार्य प्रकाश पाटील म्हणाले, गेल्या २ दिवसांपासून विद्यार्थिनींची वैयक्तिकरित्या समजूत घालण्यात येत आहे. मात्र त्या हिजाब घालण्यावर अडून बसल्या आहेत. त्यामुळे आम्हाला वर्ग भरविण्यास अडचण येत आहे. त्यामुळे नाईलाजाने खबरदारी म्हणून कॉलेजला बेमुदत सुटी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढील आदेशापर्यंत कॉलेज बंद ठेवण्यात येईल. विद्यार्थिनींना कसलाही त्रास होऊ न देता आम्ही शिक्षण देत आहोत, या प्रकरणाचा सुखांत झाल्यावर पुन्हा वर्ग भरविण्यात येतील असे प्राचार्य पाटील यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कॉलेजला सुटी जाहीर केल्यावर विद्यार्थिनी आपापल्या घरी परतल्या. यावेळी कसलाही अनुचित प्रकार टाळण्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हिजाबचा वाद असाच सुरु राहिल्यास विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणी शक्य तितक्या लवकर निर्णय द्यावा अशी सर्वांची अपेक्षा आहे.


Recent Comments