Vijayapura

खुनाच्या घटनेने विजापूर हादरले

Share

हल्लीच्या काळात जीवाला कवडीची किंमत राहिली नाही. कधी आत्महत्या तर कधी क्षुल्लक कारणावरून जीव घेणे या गोष्टी सामान्य होत चालल्या आहेत. विजापूरमध्ये आर्थिक व्यवहारातून एका जिवलग मित्राचा खून जिवलग मित्रानेच केल्याची घटना काल मध्यरात्री घडली आहे.

या खून प्रकरणानंतर विजापूर शहर हादरून गेले आहे. विजापूर शहरातील बाभळेश्वर नाका परिसरातील एका लाकडाच्या अड्ड्याच्या मालकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. महम्मद अथणी (वय ३४) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, महम्मद आणि त्याचे ६ मित्र हे एका बारमध्ये पार्टीसाठी गेले होते. यादरम्यान मित्रांमध्ये वाद निर्माण झाले आणि या वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. यादरम्यान महंमद अथणी याचा दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. सदर प्रकार हॉटेल गोदावरीच्या सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे. या प्रकारची पाहणी गांधी चौक पोलीस स्थानकातील पोलिसांनी केली असून याप्रकरणी आरोपीला पकडण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे.

१६ फेब्रुवारी रोजी रात्री १२.१५ च्या सुमारास महम्मद अथणी हा रहीम नगरच्या घरातून बाहेर पडला. पण त्यानंतर तो घरी परातलाच नाही. घरातील सदस्यांनी बराच वेळ वाट पाहिल्यानंतर देखील महम्मद घरी परतला नाही. दुसरे दिवशी सकाळी पोलीस घरात आल्यानंतर घडल्या प्रकारची माहिती कुटुंबियांना देण्यात आली. खुनातील आरोपी कोण आहेत याची माहिती असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची करण्यात आली आहे.

या खुनानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी विशेष पथकाची स्थापना केली आहे. लवकरात लवकर या खुनातील आरोपींना अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Tags: