बेळगांव रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वारावर उभारलेल्या महापुरुषांच्या पुतळ्यांसोबत विश्वरत्न, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळाही उभारण्याची मागणी दलित संघटनांनी जिलाधिकाऱ्यांकडे केली आहे.

बेळगांव शहरातील रेल्वे स्थानकाचे नुतनीकरण करण्यात येत आहे. त्याच्या प्रवेशद्वारावर स्वातंत्र्यसेनानी संगोळ्ळी रायण्णा, कित्तूर चन्नम्मा, महात्मा गांधी आदींचे पुतळे उभारले आहेत. त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचाही पुतळा उभारण्याच्या मागणीचे निवेदन ऑल इंडिया दलित युथ ऑर्गनायझेशनच्या नेतृत्वाखाली विविध दलित संघटनानी जिल्हाधिकाऱ्याना दिले.
या वेळी सुधीर चौगुले यांनी, ‘आपली मराठी’ला सांगितले कि, स्वातंत्र्यसेनानी संगोळ्ळी रायण्णा, कित्तूर चन्नम्मा, महात्मा गांधी आदींचे पुतळे उभारण्यात येत आहेत. त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळाही उभारण्यात यावा अशी मागणी केली. या विषयी खासदार मंगल अंगडी यांना ही निवेदन देण्यात आले आहे. त्यांच्या कडून सकारात्मक प्रतिसादही मिळाला आहे.
या वेळी श्रीशा चौगुले, मल्लेश चौगुले, सागर चौगुले, सुधीर चौगुले, संतोष आनंद कांबळे, हलगेकर, सुनील कोलकार, सदा कोलकार, मनोज चौगुले, विजय बोजराज आदी उपस्थित होते .


Recent Comments