बेळगाव नगरविकास प्राधिकरण योजनेंतर्गत १९८० मध्ये निर्माण करण्यात आलेली देवराज अरस कॉलनी अद्यापही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. आपल्या भागात मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी आज येथील स्थानिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

बेळगाव नगरविकास प्राधिकरण योजना ११ नुसार १९८० मध्ये देवराज अरस या कॉलनीची स्थापना करण्यात आली आहे. परंतु या कॉलनीत अद्याप कोणतीही मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने संतप्त नागरिकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आपल्याला पिण्याचे पाणी, रस्ते, गटारी अशा सर्व मूलभूत सुविधा पुरविण्यात याव्यात, अशी मागणी केली. 
देवराज अरस या कॉलनीतील वॉर्ड क्रमांक ४८ मध्ये आतापर्यंत कोणतीही मूलभूत सुविधा पुरविण्यात आली नाही. विकासकामांपासून वंचित असलेल्या या कॉलनीमध्ये वास्तव्य करताना आपण अंदमान निकोबार मध्ये राहत असल्याचे जाणवत आहे, याठिकाणी अधिकार दुर्लक्ष करत असून आपल्याला त्वरित मूलभूत सुविधा मिळाव्यात असा आग्रह व्ही बी मडिवाळर यांनी केला.
यावेळिके बी रेळेकर, एम ए बोरांनावर, बी सी मुलीमनी, बी सी कुलकर्णी, जे जे चौगुले, एस वाय रंगण्णावर, अशोक भिरडी आदी उपस्थित होते.


Recent Comments