विजापूर जिल्ह्यातील कोल्हार येथील आकाशात सोमवारी सकाळी गूढ प्रकाशाच्या फिरत्या झोतामुळे शहरवासीय आश्चर्यचकित झाले. त्यामुळे परग्रहवासी एलियन्स अवतरले की काय यापासून अनेक प्रकारच्या चर्चाना मोठा ऊत आला.

होय, एखादे डागलेले मिसाईल जसे दिसते तशा प्रकारचा प्रकाशाचा फिरता झोत आकाशात दिसून आल्याने आज सकाळी कोल्हारवासीय आश्चर्यचकित झाले. जमिनीपासून बऱ्यापैकी जवळून हा झोत जाताना दिसल्याचे पाहून नागरिकांमध्ये अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले.
सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आकाशात हे दृश्य पाहून कोल्हारमधील नागरिक स्तिमित झाले. अनेकांनी त्याचे छायाचित्र, व्हीडिओ आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केला. धुक्यामुळे याची नेमकी छबी चित्रित झाली नसली तरी सध्या याचा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.


Recent Comments