Belagavi

बेळगावात कॉलेजसमोर पोलीस बंदोबस्त

Share

 कर्नाटकात हिजाब विरुद्ध भगवा असा वाद पेटल्याने बेळगावठी पोलिसांनी दक्षता घेतली आहे. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी शहरातील कॉलेजसमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

होय, काही दिवसांपूर्वी राज्यातील काही ठिकाणच्या शाळा-महाविद्यालयात हिजाब विरुद्ध भगवा असा नाहक वाद पेटला आहे. त्यामुळे अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी सावधगिरीचा उपाय म्हणून राज्यातील हायस्कुल आणि महाविद्यालयानं सरकारने ३ दिवस सुटी जाहीर केली आहे. हिजाबप्रकरणी उच्च न्यायालयात सुरु असलेल्या खटल्यावर न्यायालय आज निकाल देण्याची शक्यता असल्याने अनुचित प्रतिसाद उमटू नयेत यासाठी बेळगावातही पोलिसांनी खबरदारी घेतली आहे.

शहरातील प्रत्येक सरकारी आणि खासगी कॉलेजसमोर तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरातील ज्योती कॉलेज, सरदार्स कॉलेज, आर. एन. शेट्टी कॉलेज, लिंगराज कॉलेज आदी ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहर पोलीस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या यांनी अनेक कॉलेजने भेटी देऊन बंदोबस्ताचा आढावा घेतला.

 

Tags: