Belagavi

पदयात्रेने आलेल्या हणबर, यादव समाजबांधवांची बेळगावात निदर्शने

Share

हणबर समाजाच्या एकमेव आमदार पौर्णिमा यांना मंत्रिपद देण्याच्या मागणीसाठी चिक्कोडीहून पदयात्रेने आलेल्या हणबर आणि यादव समाजबांधवांनी आज बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

: हणबर समाजाच्या राज्यातील एकमेव आमदार पौर्णिमा यांना किमान यावेळच्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद द्यावे अशी मागणी हणबर समाजाने केली आहे. या मागणीसाठी चिक्कोडीतून गेल्या ३ दिवसांपासून काढलेल्या पदयात्रेचे आज बेळगावात आगमन झाले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पदयात्रा आल्यावर हणबर समाजबांधवांनी जोरदार निदर्शने केली. नंतर पक्षश्रेष्ठींवर दबाव आणून हिरियूरच्या आ. पौर्णिमा याना मंत्रिपद देण्याच्या मागणीचे, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नावाचे निवेदन अधिकाऱ्यांना देण्यात आले.

हणबर आणि यादव समाजाची राज्यात सुमारे ५० लाख लोकसंख्या आहे. मात्र या समाजाला अद्याप न्याय मिळालेला नाही. त्यामुळे यावेळच्या मंत्रिमंडळ विस्तारात आ. पौर्णिमा श्रीनिवास यांना मंत्रिपद द्यावे अशी मागणी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे करण्यात आली आहे असे हणबर, यादव समाजाच्या नेत्यांनी सांगितले.

विकासापासून वंचित असलेल्या हणबर समाजाच्या या मागणीला सरकार कसा प्रतिसाद देते हे पहावे लागेल.

 

 

 

Tags: