Belagavi

पालकमंत्र्यांच्याहस्ते उत्तम नागरी सेवा पुरस्कार प्रदान

Share

 बेळगाव जिल्ह्यात कोविड१९ संकट काळात आणि लसीकरण मोहिमेत उल्लेखनीय योगदान दिलेल्या आरोग्य अन्य खात्याच्या अधिकारीकर्मचाऱ्यांना २०२०२१ या वर्षासाठीचे उत्तम नागरी सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.  

बेळगावात बुधवारी सकाळी जिल्हा क्रीडांगणावर आयोजित ७३व्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांच्याहस्ते जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याचे लसीकरण अधिकारी डॉ. ईश्वरप्पा गडाद, जिल्हा आरोग्य सर्वेक्षणाधिकारी डॉ. बी. एन. तुक्कार, कन्नड व संस्कृती खात्याच्या सहायक संचालिका विध्यावती बजंत्री यांच्यासह विविध खात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना २०२०-२१ या वर्षासाठीचे उत्तम नागरी सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी बेळगाव उत्तरचे आ. अनिल बेनके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

 

Tags: