Belagavi

रायण्णा यांची पुण्यतिथी हुतात्मा दिन म्हणून साजरी

Share

क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांची पुण्यतिथी आज बेळगावात हुतात्मा दिन म्हणून साजरी करण्यात आली.

होय, बलाढ्य ब्रिटिश सत्तेशी शौर्याने झुंजणाऱ्या संगोळ्ळी रायण्णा याना ब्रिटिशांनी पकडून नंदगडजवळ वडाच्या झाडाला फाशी दिली तो दिवस योगायोगाने २६ जानेवारी १८३१चा. स्वातंत्र्यानंतर भारताने प्रजासत्ताक देश म्हणून याचदिवशी सार्वभौमत्व स्वीकारले. त्यामुळे हा दिवस प्रजासत्ताक दिनासोबतच संगोळ्ळी रायण्णा यांचा हुतात्मा दिवस म्हणून पाळण्यात येतो. यानिमित्त बेळगावातील बसवराज कट्टीमनी सभागृहात आज जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हुतात्मा दिन कार्यक्रम झाला. यावेळी मंत्री कारजोळ व अन्य मायवरांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन केले.

यावेळी बोलताना पालकमंत्री गोविंद कारजोळ म्हणाले, संगोळ्ळी रायण्णा यांनी ब्रिटिश सत्तेविरोधात शौर्याने लढा दिला. प्रजासत्ताक दिनीच त्यांचा हुतात्मा दिन साजरा करण्यात येतो. संगोळ्ळी रायण्णा यांचे नाव अजरामर करण्यासाठी आमच्या सरकारने त्यांच्या नावे सैनिक शाळा उभारून देशभक्त तरुण पिढी घडवण्याचा वसा उचलला आहे. येत्या काही महिन्यांतच हे काम पूर्ण होऊन शाळेचे लोकार्पण करण्यात येईल.

यावेळी अपर जिल्हाधिकारी अधिक दुडगुंटी, प्रांताधिकारी कर्लिंगन्नावर, कन्नड व संस्कृती खात्याच्या सहायक संचालिका विद्यावती बजंत्री यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

 

 

Tags: