Belagavi

अखेर जिल्ह्याना लाभले पालकमंत्री ! बेळगावला कारजोळ

Share

दीर्घ काळच्या प्रतीक्षेनंतर अखेर कर्नाटकातील जिल्ह्यांना हक्काचे पालकमंत्री लाभले आहेत. बेळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रिपद जलसंसाधनमंत्री गोविंद कारजोळ यांनाच पुढे चाल देण्यात आली आहे.

बहुप्रतीक्षित पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या अखेर जाहीर करण्यात आल्या आहेत. जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची यादी पुढीलप्रमाणे : रामनगर : अश्वथनारायण, विजापूर : उमेश कत्ती, कलबुर्गी (गुलबर्गा) : मुरुगेश निराणी, कोप्पळ : आनंदसिंग, यादगिरी : प्रभू चव्हाण, चित्रगुर्ग आणि गदग : बी. सी. पाटील, बेंगळूर ग्रामीण : डॉ. के. सुधाकर, म्हैसूर : एस. टी. चंद्रशेखर, विजयनगर : शशिकला जोल्ले, शिवमोग्गा : के. सी. नारायनगौडा, कोडगू : बी. सी. नागेश, बेंगळूर महानगर : बसवराज बोम्मई, चिक्कमंगळूर : के. एस. ईश्वरप्पा, बळ्ळारी : बी. श्रीरामुलू, उडुपी : एस. अंगार, तुमकूर : अरग ज्ञानेंद्र, बागलकोट : सी. सी. पाटील, उत्तर कन्नड : कोटा श्रीनिवास पुजारी, चिक्कबळ्ळापूर : एमटीबी नागराज, दक्षिण कन्नड : सुनीलकुमार, बीदर आणि रायचूर : शंकर पाटील-मुनेनकोप्प, दावणगेरे : भैरत्ती बसवराज, धारवाड : हालप्पा आचार, कोलार : मुनिरत्न, चामराजनगर : व्ही. सोमाण्णा, हावेरी : शिवराम हेब्बार, मंड्या आणि हासन : के. गोपालय्या.

काही महिन्यांपूर्वी येडियुरप्पा यांना हटवून बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्री करण्यात आले होते. तेंव्हापासून जिल्हा पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या रखडल्या होत्या. आता प्रजासत्ताक दिन तोंडावर आला असताना तातडीने पालकमंत्री नेमण्यात आले आहेत.

 

 

 

Tags: