बेळगाव ग्रामीण मतदार संघात विविध ठिकाणी लाखो रुपयांच्या खर्चातून करण्यात येणाऱ्या विकासकामांना आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी चालना दिली.

बेळगावच्या मस्तमर्डी या गावात पंचायत राज इंजिनियरिंग विभागाच्या अनुदानातून ९.४० लाख रुपयांच्या खर्चातून रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे बसवेश्वर देवस्थानाच्या आवरणात पेव्हर्स बसविण्यात येत आहेत. या कामांचा आज शुभारंभ करण्यात आला.
यावेळी गावातील सरकारी हायस्कुलच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि शिक्षणासंदर्भात देखील चर्चा करण्यात आली. शाळा प्रांगणात पेव्हर्स बसविण्याच्या कामाचाही शुभारंभ यावेळी करण्यात आला.
यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक, यल्लाप्पा तोरली, अशोक तोरली, प्रकाश पाटील, श्रीशैल पाटील, एल जी पाटील, वाय के परंडे, परशुराम कुरंजी, बाळू कुरंजी, बसवराज तोरली, बसवराज कोलकार, संतोष मद्देप्पगोळ, मारुती चंद्रू जंगली, विजय बी पाटील, महानंद मरकट्टी, सुनीता पारिशवाड, रामा मिरजी, दिलीप सुरेश पाटील, राघवेंद्र माविनकट्टी आदी उपस्थित होते.
यावेळी तारिहाळ गावातदेखील आमदार लक्ष्मी हेब्बाळकरांनी विकासकामांना चालना दिली. डॉ. बाबू जगजीवनराम भवन इमारत बांधकाम कामकाज, समाज कल्याण विभागाच्या अनुदानांतर्गत एकूण १० लाख रुपयांच्या खर्चातून विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. रस्ते कामकाज, शाळा इमारत, तसेच तारिहाळ गावातील इतर विकासकामांनाही यावेळी चालना देण्यात आली. .
यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक, स्थानिक लोकप्रतिनिधी, सुरज जाधव, यल्लाप्पा गुंडदडकर, नामदेव जोगांनावर, बसवराज तलवार, लक्ष्मण मुचंडी, इराप्पा भुम्माण्णावर, बसवराज वाणी, यल्लेशी जोगांनावर, प्रमोद जाधव आदी उपस्थित होते,.


Recent Comments