बेळगाव जिल्हा प्रशासनाच्या वतीने २६ जानेवारी रोजी आचरणात आणण्यात येणाऱ्या प्रजासत्ताक दिनासंदर्भात आज स्वागत समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.

बेळगावमध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासंदर्भात स्वागत समितीची बैठक बोलाविण्यात आली होती. सकाळी मनपा सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पालिका आयुक्त रुद्रेश घाळी हे होते. या सभेत स्वागत समितीच्या जबाबदारीसंदर्भात चर्चा करण्यात आली. 
यावेळी स्वागत समितीचे सदस्य विकास कलघटगी बोलताना म्हणाले, बाजारात विकल्या जाणाऱ्या प्लास्टिक राष्ट्रध्वजावर बंदी घालावी. तसेच व्यापाऱ्यांनी हा ध्वजाची विक्री न करता बाजारपेठेबाबत जनजागृती करावी. प्लास्टिकऐवजी कापडी ध्वजांचा वापर करावा. अनेक ठिकाणी ध्वज आचारसंहिता पाळली जात नाही. ध्वजाची उंची, ध्वज बांधणे, संध्याकाळी ध्वज उतरवणे यात अनेक चुका होतात. यासाठी आपण राष्ट्रीय ध्वज संहितेबाबतही जनजागृती केली पाहिजे. अशा सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी रुद्रेश घाळी यांनी प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम आयोजित करताना कोरोनासंदर्भातील सर्व मार्गसूचीचे काटेकोरपणे पालन करून काळजीपूर्वक कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.
या बैठकीला विकास कलघटगी, माजी नगरसेवक शीला देशपांडे, छाया कल्याणशेट्टी, यल्लाप्पा हुदली आदींसह सार्वजनिक बांधकाम विभाग, हेस्कॉम आणि इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments