Belagavi

छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा

Share

छत्रपती संभाजी महाराज यांचा ३४१ वा राज्याभिषेक दिन बेळगावात धर्मवीर संभाजीराजे उत्सव धर्मवीर संभाजीराजे चौक सुशोभीकरण समिती यांच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला.

बेळगावातील धर्मवीर संभाजी महाराज चौकातील धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला. आ. अनिल बेनके यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला  पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर महाआरती करण्यात आली.

यावेळी आ. अनिल बेनके यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या देश, धर्मासाठी दाखवलेले शौर्य आणि केलेल्या त्यागाचे स्मरण केले.

प्रास्ताविकात राजू शेट्टी यांनी छत्रपती संभाजी राजे यांच्या जीवनकार्याविषयी माहिती दिली. प्रसाद मोरे यांनी आभार मानले. यावेळी नगरसेवक जयतीर्थ सौंदत्ती, सुनील जाधव, श्रीनाथ पवार, आदित्य पवार, ओंकार मोहिते, निशांत कुडे, सौरभ बामणे, गजानन पोवार, प्रसाद पोवार, गणेश जाधव, सोनू किल्लेकर, ज्योतिबा पवार, ओंकार नूलेकर, प्रज्वल करेगार, धनंजय साळुंके आदी उपस्थित होते.

Tags: