कोरोनाच्या नियंत्रणासाठी सरकारने विकेंड कर्फ्यू लावला आहे. मात्र कसलीही पर्वा न करता बेळगावातील जयकिसान भाजीमार्केट्मध्ये यंदाच्या दुसऱ्या विकेंड कर्फ्यूच्या पहिल्याच दिवशी आज नागरिकांनी कोरोनाचे नियम पायदळी तुडवत तोबा गर्दी केली.

नव्या जयकिसान होलसेल भाजीमार्केट्मध्ये सकाळपासूनच मोठी गर्दी होत आहे. आज शनिवारी विकेंड कर्फ्यूच्या पहिल्याच दिवशी याचा पुन्हा प्रत्यय आला. शेकडो लोकांनी इथे खरेदीसाठी गर्दी केली. परंतु स्थानिक प्रशासन किंवा पोलिसांनी त्याकडे काणाडोळा केला.
बेळगावातील गांधीनगरजवळ हे मार्केट उभारण्यात आले आहे. येथे बेळगाव तालुक्यासह जिल्ह्यातील व परजिल्ह्यांतील विविध ठिकाणांहून व्यापारी, शेतकरी भाजी खरेदी-विक्रीसाठी येतात. पहाटे ४ वाजल्यापासूनच येथे व्यवहार सुरु होतात. सुमारे ९ वाजेपर्यंत येथे मोठी गर्दी होत आहे. याशिवाय जवळपासचे फळ विक्रेतेही आपली वाहने घेऊन येथे दाखल होत आहेत. त्यामुळेही गर्दीत वाढ होत आहे. परंतु कोणीही मास्कचा वापर करत नाहीत अन सामाजिक अंतरही पाळत नाहीत. हे पाहता येथील व्यापारी, ग्राहकांना कोरोनाची भीती मुळीच नसल्याचे दिसून येत आहे. 


Recent Comments