सध्या बेळगावचा पार घसरला असून अशा कडाक्याच्या थंडीत दोन निराधार व्यक्ती हिंदवाडी परिसरातील बस्थानकावर निवारा घेत होती. हे दृश्य पाहून हिंदवाडी येथील सुजाण नागरिकांनी पुढाकार घेऊन या दोघांचीही सोय येथील सरकारी निराधार केंद्रात केली आहे.

हिंदवाडी येथील गोमटेश शाळेजवळ असलेल्या बस्थानावर आश्रय घेतलेल्या दोघांचीही सोय येथील स्थानिक नागरिकांनी सरकारी निराधार केंद्रात केली आहे.
या बसस्थानकावर इतक्या कडाक्याच्या थंडीत हे दोघेही आसरा घेत होते. हिंदवाडी येथील काही सुजाण नागरिकांनी माणुसकीचे दर्शन घडवत या दोघांचीही सोय सरकारी निराधार केंद्रात केली आहे. या दोन्ही व्यक्ती अस्वस्थ असल्याचे निदर्शनास आले होते. बसस्थानकावर त्यांनी निवारा घेत कडाक्याच्या थंडीत बसस्थाकावरच झोपल्याचे निदर्शनास येताच नागरिकांनी त्यांची सोय योग्य ठिकाणी करण्याचा विचार करून निराधार केंद्रात त्यांना आसरा मिळवून दिला आहे.


Recent Comments