Belagavi

मास्क, वाहतूक नियम पालनासाठी बेळगावात पोलिसांची जागृती

Share

मास्कचा वापर आणि वाहतुकीचे नियम पाळण्याविषयी जनजागृती करण्यासाठी बेळगावात पोलिसांनी अनोखी मोहीम सुरु केली आहे. लाठी आणि शिट्टी बाजूला ठेवून हातात माईक घेऊन जनतेला आवाहन सुरु केले आहे.

होय, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना मास्क घालण्यास तसेच वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी बेळगाव पोलिसांनी लाठी काही काळ बाजूला ठेवली आहे. त्याऐवजी हातात माईक घेऊन शहरातील चन्नम्मा चौकासह प्रमुख चौक आणि रस्त्यांवर जनजागृती करण्यात आली.

डीसीपी स्नेहा पी. व्ही. यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी शहरात ही मोहीम राबविण्यात आली. चन्नम्मा चौकातील बसथांब्यांवर थांबलेले विध्यार्थी आणि नागरिकांमध्ये तसेच वाहनचालकांमध्ये कोरोनाचे नियम, मास्क वापरणे आणि वाहतूक नियमांबद्दल माहिती देऊन जागृती करण्यात आली. चन्नम्मा चौक, आरटीओ सर्कल, धर्मवीर संभाजी महाराज चौक, गोवावेस बसवेश्वर सर्कल आदी चौकांत व प्रमुख रस्त्यांवर ही मोहीम राबवून जनजागृती करण्यात आली..

 

Tags: