Belagavi

डीसीपी डॉ. विक्रम आमटे यांची तडकाफडकी बदली

Share

दक्ष आणि प्रामाणिक पोलीस अधिकारी म्हणून ख्याती मिळवलेले बेळगावचे डीसीपी डॉ. विक्रम आमटे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी रवींद्र गडादी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विधिमंडळ काळात बेळगावात पुतळा विटंबनेनंतर दगडफेक व शांतताभंगाचा ठपका ठेवून बेळगावचे पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांची परवाच बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागी डॉ. बोरलिंगय्या यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आज अचानक डीसीपी डॉ. विक्रम आमटे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी रवींद्र गडादी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गडादी यांनी यापूर्वी बेळगाव जिल्हा अपर पोलीस अधीक्षक म्हणून सेवा बजावली होती. त्यांना नुकतीच आयपीएस रँक प्राप्त झाली आहे.

Tags: