Belagavi

बेळगावात पोलीस क्रीडास्पर्धांना प्रारंभ

Share

 क्रीडा स्पर्धेतील सहभागामुळे आपली कार्यक्षमता वाढते. त्यामुळे हारजीत यापेक्षाही स्पर्धेतील सहभाग महत्वाचा आहे असे विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. करिसिद्दप्पा यांनी सांगितले.  

बेळगाव जिल्हा पोलिसांच्या ३ दिवसीय वार्षिक क्रीडास्पर्धांचे मंगळवारी बेळगावातील पोलीस परेड मैदानावर उदघाटन केले. यावेळी विविध पोलीस पथकांनी आकर्षक पथसंचलन केले.

या आकर्षक पथसंचलनाची प्रशंसा करून करिसिद्धप्पा म्हणाले, क्रीड़ा स्पर्धांतील सहभाग शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य अखंड राखण्यास मदत करतो. पुरस्कार मिळ्वण्यापेक्षाही क्रीड़ा स्पर्धांत सहभाग घेणे महत्वाचे आहे. क्रीडास्पर्धांमुळे सुरक्षा दलात आपण समाजकंजे काही देणे लागतो ही भावना वाढीस लागते.

https://www.facebook.com/watch/live/?extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C&ref=watch_permalink&v=438697231068515

गेली २ वर्षे आरोग्य कर्मचारी व पोलिसांनी कोरोना वॉरियर्स म्हणून काम करताना अनेक संकटांचा सामना केला आहे. अशा संकटाना सामोरे जाण्याचे बळ क्रीडास्पर्धांतून मिळते असे त्यांनी सांगितले.  यावेळी बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी, सीएआर एसपी काश्यपणावर व अन्य पोलीस अधिकारी उपस्थित होते.

 

Tags: