स्मार्ट सिटी योजनेतून लाखो रुपये खर्चून केलेल्या बेळगावातील पांगुळ गल्लीतील रस्त्याचे काम निकृष्ट झाले आहे. सोमवारी येथे विटावाहू ट्रक अडकून बसल्याने या कामाची लायकी जगजाहीर झाली.

होय, बेळगावातील पांगुळ गल्लीतील चंद्रप्रभ श्वेतांबर जैन मंदिरासमोर सोमवारी विटांची वाहतूक करणारा ट्रक रस्ता खचल्याने जागीच अडकून पडला. रस्त्यात रुतून बसलेल्या ट्रकमुले वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. त्याचप्रमाणे या निकृष्ट कामाची व त्यातील भ्रष्टाचाराची सगळ्यांना प्रचिती अली. केवळ चारच महिन्यांपूर्वी स्मार्ट सिटी योजनेतून लाखो रुपये खर्च करून हा रस्ता तयार करण्यात आला आहे. कंत्राटदाराने निकृष्ट साहित्य वापरल्यानेच रस्त्याचे दिवाळे वाजल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.


Recent Comments