Belagavi

युवक-युवतींसाठी करडीगुद्दी येथे पक्षी निरीक्षण शिबिर

Share

युथ फॉर सेवा, बेळगाव या संस्थेतर्फे युवक-युवतींसाठी करडीगुद्दी येथे पक्षी निरीक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.

बेळगावातील युथ फॉर सेवा या सेवाभावी संस्थेतर्फे युवक-युवतींसाठी करडीगुद्दी येथे पक्षी निरीक्षण शिबिर घेण्यात आले. यावेळी प्लॅस्टिकच्या विरोधात जागृती, पेपर बॅग बनविणे, बाटल्यांतून जलसिंचन, पक्षी आणि साप निरीक्षण आणि पर्यावरणाच्या संरक्षणासंदर्भात युवावर्गात माहिती देऊन जागृती करण्यात आली.

सुमारे ७० युवक-युवतींनी या शिबिरात भाग घेतला. संस्थेचे जिल्हा संयोजक संतोष खोत, स्वयंसेवक सौरभ कळसकर आदींनी शिबिरार्थींना पक्षी निरीक्षण आणि अन्य बाबतीत माहिती देऊन प्रबोधन केले. शिबिरात स्वयंसेवक प्रेम, शंकर, विनायक, नीला, भूमिका, अक्षता, मुरारी, नस्लेन, स्पुर्ती आदी सहभागी झाले होते.युथ फॉर सेवा, बेळगाव या संस्थेतर्फे युवक-युवतींसाठी करडीगुद्दी येथे पक्षी निरीक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.
बेळगावातील युथ फॉर सेवा या सेवाभावी संस्थेतर्फे युवक-युवतींसाठी करडीगुद्दी येथे पक्षी निरीक्षण शिबिर घेण्यात आले. यावेळी प्लॅस्टिकच्या विरोधात जागृती, पेपर बॅग बनविणे, बाटल्यांतून जलसिंचन, पक्षी आणि साप निरीक्षण आणि पर्यावरणाच्या संरक्षणासंदर्भात युवावर्गात माहिती देऊन जागृती करण्यात आली. सुमारे ७० युवक-युवतींनी या शिबिरात भाग घेतला. संस्थेचे जिल्हा संयोजक संतोष खोत, स्वयंसेवक सौरभ कळसकर आदींनी शिबिरार्थींना पक्षी निरीक्षण आणि अन्य बाबतीत माहिती देऊन प्रबोधन केले. शिबिरात स्वयंसेवक प्रेम, शंकर, विनायक, नीला, भूमिका, अक्षता, मुरारी, नस्लेन, स्पुर्ती आदी सहभागी झाले होते.

Tags: