Vijayapura

आंतरराष्ट्रीय सौंदर्यस्पर्धेत चमकल्या विजापूरच्या माय-लेकी

Share

टीम फॅशन गोवा तर्फे आयोजित करण्यात आलेल्या सी वाइब्स या आंतरराष्ट्रीय सौंदर्यवती स्पर्धेत विजापूरमधील माय लेकी चमकल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत पूजा जहागीरदार या युवतीने किताब पटकाविला असून या स्पर्धेचे अनेक टप्पे भारतातील विविध भागात पार पडले आहेत. अंतिम फेरीसाठी गोव्यात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या सौंदर्यवती स्पर्धेत चाळीस सौंदर्यवती स्पर्धकांना मागे टाकून विजापूरच्या पूजा जहागीरदारने बहुमान पटकाविला आहे.

सौंदर्यवती स्पर्धेत पूजा जहागीरदार या युवतीने अनेक फेऱ्यांना उत्तमरीत्या पार केले असून तिची आई कविता जहागीरदार यांनाही ‘बेस्ट फोटोजनीक फेस’ या किताबाने सन्मानित करण्यात आले आहे. या स्पर्धेत मायलेकींनी कमावलेल्या यशाचे कौतुक होत आहे.

Tags: