Belagavi

बेळगावच्या बिशप हाऊसमध्ये सर्वधर्मियांकडून ख्रिसमस साजरा

Share

बेळगावातील कॅम्पमधील बिशप हाऊसमध्ये नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात आला.

शनिवारी सायंकाळी बेळगाव क्षरिशचं धर्मप्रांताचे बिशप डेरेक फर्नांडिस यांच्या निवासस्थानी प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मदिन ख्रिसमस उत्साहात साजरा करण्यात आला. विविध समाजाच्या नेत्यांनी यावेळी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी बेळगावचे माजी आ. फिरोज सेठ, काँग्रेस शहराध्यक्ष राजू सेठ, डॉ. अनिल पाटील, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ आनंद, माजी उपाध्यक्ष साजिद शेख, अर्थतज्ज्ञ नितीन खोत यांच्यासह विविध समाजाच्या, धर्माच्या मान्यवरांनी उपस्थित राहून ख्रिसमस साजरा केला. यावेळी बोलताना बिशप डेरेक फर्नांडिस यांनी, जगातील सर्वच महापुरुषांनी जसा शांतीचा, प्रेमाचा संदेश दिला तसाच संदेश प्रभू ख्रिस्तांनी दिला. आजच्या परिस्थितीत आम्ही सर्वानी या महापुरुषांच्या संदेशाचे पालन करणे आवश्यक आहे.

यावेळी माजी आ. फिरोज सेठ यांनी, ख्रिश्चन समाजाने शिक्षण क्षेत्राला दिलेल्या योगदानाची प्रशंसा करून आपणही ख्रिश्चन शाळेतच शिक्षण घेतल्याचे सांगितले.

त्यानंतर बोलताना डॉ. अनिल पाटील यांनी, सर्वाना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या. सर्वाना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी झटणाऱ्या ख्रिश्चन समाजाचे आपण ऋणी रहायला हवे असे त्यांनी सांगितले.

यावेळी पत्रकार लुईस रॉड्रिग्ज यांच्यासह ख्रिश्चन फादर्स, पास्टर्स उपस्थित होते.

 

 

Tags: