विजापूर शहरात आज मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे आगमन झाले. हुबळी येथून विशेष हेलिकॉप्टरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी विजापूरमध्ये आगमन केले.

यावेळी मंत्री गोविंद कारजोळ, व्ही सोमाण्णा, आमदार यत्नाळ, एम बी पाटील, सोमनगौडा पाटील तसेच इतर आमदारांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. यानंतर माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शहरातील प्रमुख मार्गांवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी विजापूर जिल्ह्यातील विविध विकासकामांसंदर्भात आढावा घेतला. गरिबांना घरे देण्याची आवश्यकता, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचा कोनशिला, तसेच विविध विकासकामांना चालना देण्यात आली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचा विकास करण्यात येईल, असे आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी दिले. 
नव्या वर्षाच्या स्वागतासंदर्भात प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले, ओमीक्रॉन चा धोका वाढत चालला असून महाराष्ट्र, केरळसह आता तामिळनाडूमध्येही रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर उद्या बेंगळूरमध्ये तज्ञ समितीशी बैठक झाल्यानंतर निर्णय घेण्यात येणार आहे. अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
विजापूर जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर विजापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा विश्वास मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केला.


Recent Comments