Belagavi

रक्तदानाच्या माध्यमातून बसवजय मृत्युंजय स्वामींचा वाढदिवस

Share

 कुडलसंगमच्या लिंगायत पंचांसाली पिठाचे प्रथम जगद्गुरू बसवजय मृत्युंजय स्वामी यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याच अनुषंगाने राज्यभरात अनेक ठिकाणी पंचांसाली समाजाच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

पंचमसाली समाजाला २-ए या श्रेणीत आरक्षण मिळावे, यासाठी कुडलसंगमपासून बेंगळुरूपर्यंत भव्य पदयात्रेच्या माध्यमातून बसवजय मृत्युंजय स्वामी यांनी अनेक आनॊदलाने केली. गुरुवारी बसवजय मृत्युंजय स्वामींच्या जन्मदिवसाच्या औचित्याने बेळगावमधील गांधी भावांमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकरी दिनाच्या औचित्याने रोपांना पाणी घालण्यात आले. या कार्यक्रमाला राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना बसवजय मृत्युंजय स्वामी म्हणाले, जागतिक शेतकरी दिन आणि जन्मदिवसाच्या औचित्याने राज्यभरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कोविड पार्श्वभूमी आणि सीडीएस यांच्या अकाली निधनामुळे हा कार्यक्रम सध्या पद्धतीने आयोजित करण्यात आला आहे. राज्यातील बागलकोट, विजापूर, गुलबर्गा, दावणगेरे, म्हैसूर यासह अनेक ठिकाणी रक्तदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती बसवजय मृत्युंजय स्वामी यांनी दिली.

 १४ जानेवारी रोजी कुडलसंगम पदयात्रेच्या वर्धापनदिन आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. यावेळी आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रीय बसव कृषी पुरस्कार प्रधान करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.  बेळगाव सुवर्णसौधसमोर कित्तूर राणी चन्नम्मा, संगोळी रायन्ना पुतळा प्रतिष्ठापना करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली असून याचा आपल्याला आनंद असल्याचे ते म्हणाले. यासोबतच बसवेश्वर महाराजांचा पुतळाही सुवर्णसौध समोरील परिसरात स्थापन करण्यात यावा, असा आग्रह त्यांनी केला.  यानंतर पंचमसाली युवा घटकचे जिल्हाध्यक्ष रुद्रांना चंदरगी म्हणाले, आपला जन्मदिवस अर्थपूर्णरीत्या साजरा करण्यासाठी स्वामींनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे आहे. सुमारे २० हजार युवकांनी रक्तदानासाठी पुढाकार घेतला आहे. अशाचपद्धतीने समाज संघटन करून स्वामींना दीर्घायुष्य लाभो, अशा शुभेच्छा चंदरगी यांनी दिल्या. या कार्यक्रमाला पंचमसाली समाजाचे जिल्हाध्यक्ष आर. के. पाटील, शहर विभागाचे जिल्हाध्यक्ष राजू मगदूम निंगाप्पा पिरोजी, रामनगौडा पाटील, आदी उपस्थित होते.

Tags: