Vijayapura

राहुल पाटील यांनी मानले आ. यत्नाळ यांचे आभार

Share

मराठा विकास महामंडळाची घोषणा लवकरात लवकर करण्यात यावी, अशी मागणी मराठा समाजाचे नेते राहुल जाधव यांनी केली आहे. हा विषय आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी सभागृहात मांडल्यामुळे त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या कालावधीत मराठा विकास महामंडळाची घोषणा करण्यात आली होती. परंतु अजूनही याची स्थापना करण्यात आली नाही. यासंदर्भात विधानसभा अधिवेशनात भाजप आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी मुद्दा उपस्थित करून आवाज उठविला. शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित करण्यात आला असून त्वरित मराठा विकास महामंडळाची स्थापना करण्याचा आग्रह करण्यात आला. सभागृहात मराठा समाजासंदर्भात आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी व्यक्त केलेल्या काळजीबद्दल विजापूर जिल्ह्यातील मराठा समाजाचे युवा नेते राहुल जाधव यांनी आभार मानले. सरकारने लवकरात लवकर मराठा विकास महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी त्यांनी केली.

Tags: