Belagavi

कोल्हापुरात झळकले शिवरायांचे 40 फूट उंच आणि 100 फूट रुंद भव्य पोस्टर; बंगळुरात शिवरायांच्या विटंबनेचा निषेध

Share

सळसळणाऱ्या तरुणाईचा झंझावात…भिरभिरणारे भगवे ध्वज…. आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय, ‘जय भवानी जय शिवाजी घोषणांचा पाऊस अशा उत्स्फूर्त आणि शिवमय वातावरणात सोमवारी कोल्हापूर येथील छत्रपती शिवाजी चौकात शिवरायांचे 40 फूट उंच आणि 100 फूट रुंद भव्य पोस्टर झळकावण्यात आले.

यानंतर साऊंड सिस्टीमवर महाआरती म्हणत शिवछत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या कर्नाटक सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन कऱण्यात आले.

कर्नाटकातील बंगळूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचे तीव्र पडसाद कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. याच कालावधीत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी घटनेविषयी अवमानकारक शब्द वापरल्याने त्याबद्दलही मराठी भाषिकांसह विविध पक्ष- संघटनांच्या वतीने या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. याचाच एक भाग म्हणून सोमवारी कोल्हापुरात शहर शिवसेनेच्या वतीने कर्नाटक सरकारचा छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांचे भव्य पोस्टर उभारुन निषेध केला.

Tags: