Belagavi

नंदिनीच्या बनावट तूप उत्पादनाबाबत सभागृहात मांडला मुद्दा  कारवाई करण्याची मंत्री एस टी सोमशेखर यांची माहिती

Share

म्हैसूरमध्ये नंदिनी तुपाचे बनावट उत्पादन केले जात आहे. बनावट तूप उत्पादन करणाऱ्या टोळीविरोधात कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती सहकार मंत्री एस. टी. सोमशेखर यांनी दिली.

बेळगाव सुवर्णसौध परिसरात प्रसारमाध्यमांशी सहकार मंत्री संवाद साधत होते. म्हैसूरमध्ये नंदिनी तुपाचे बनावट उत्पादन करणारी टोळी सापडली आहे. या टोळीविरोधात पोलिसांना माहिती देण्यात आली असून त्यांच्यावर एफआयआर देखील दाखल करण्यात आली आहे. दररोज १०० मेट्रिक टन तूप उत्पादन घेण्यात  येत आहे.

उत्कृष्ट दर्जाचे दूध संग्रहित करून दरवर्षी तिरुपतीला ४१० टन  तूप देण्यात येते. मिलिटरीलाही शब्द देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे इतर अनेक ठिकाणी शुद्ध नंदिनी तुपाचा पुरवठा करण्यात येतो. परंतु या तुपाचे बनावट उत्पादन घेण्यात येत असल्याचे समोर आले असून यासंदर्भात केएमएफ ला माहिती देण्यात आली आहे, असे एस. टी. सोमशेखर यांनी सांगितले.

नंदिनी तुपाबद्दल ग्राहकांचा उत्तम अभिप्राय आहे. नंदिनी तूप अत्यंत शुद्ध प्रतीचे असून कर्नाटकातील या शुद्ध तुपाच्यासंदर्भात सध्या सुरु असलेल्या बनावट उत्पादनामुळे कंपनीच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचत असल्याचेही मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

Tags: