आपल्याविरोधात बातम्या प्रसिद्ध करू नयेत म्हणून कोर्टातून स्टे आणणारे १२ महाशय आहेत. तरीही शिस्तबद्ध म्हणवणाऱ्या पक्षाचे नेते गप्प का आहेत असा सवाल काँग्रेसचे विधान परिषद सदस्य सी. एम. इब्राहिम यांनी केला.

बेळगावात शुक्रवारी सुर्वणसौधमध्ये पत्रकारांशी बोलताना इब्राहिम म्हणाले, सरकारला कोणत्या भाषेत सांगावे हे समजत नाहीय. कन्नड किंवा इंग्लिशमध्ये सांगितले तरी कळत नाही. त्यामुळे त्यांच्याच भाषेत रमेशकुमार यांनी सांगितले आहे. सदानंद गौडांचा व्हिडिओ आहे. मात्र ते सदा हसतच असतात. त्यांनी का कोर्टातून स्थगिती आदेश आणला? आता भाजप आणि ‘केशवकृपा’वाले का गप्प आहेत. रमेशकुमार ब्राह्मण आहेत. पण ते ‘केशवकृपा’वाले आणि बसवादी शरणांच्यामध्ये आहेत असा पलटवार इब्राहिम यांनी केला.
रमेशकुमार यांचे विधान योग्य आहे का? या प्रश्नावर इब्राहिम म्हणाले, मला ८ मुली आहेत. रमेशकुमार कोणत्या अर्थाने बोलले आहेत हे माहित नाही. रमेशकुमार यांच्या विधानावर सभापती हसले. ते सभापती स्थानावर असतानाच त्यांनी ते विधान काढून टाकायला पाहिजे होते. पण त्याचा आणि याचा संबंध नाही. दोघेही एकाच अर्थाने बोलले आहेत असे त्यांनी सांगितले.
एकंदर आपल्या खास शैलीत इब्राहिम यांनी भाजप नेत्यांवर पलटवार केला.


Recent Comments