विणकरांच्या विविध समस्यांबाबत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज लोकप्रतिनिधी आणि विणकर नेत्यांशी चर्चा केली.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी बेळगावात विणकरांच्या समस्यांबाबत बैठक पार पडली. या बैठकीला जलसंसाधन आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गोविंद कारजोळ, साखर व वस्त्रोद्योग मंत्री शंकर पाटील-मुनेनकोप्प, आ. सिद्धू सवदी, वीराण्णा चरंतीमठ, अभय पाटील, महादेवप्पा यादवाड, अर्थखात्याचे एसीएस आयएसएन प्रसाद, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव मंजुनाथ प्रसाद यांच्यासह विणकर नेते उपस्थित होते. यावेळी राज्यातील विणकर, वस्त्रोद्योग व्यावसायिकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.


Recent Comments