बेळगावातील सुवर्णसौधमध्ये बुधवारी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नूतन आमदारांचा सत्कार करण्यात आला.

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सुवर्णसौधमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. या बैठकीत विरोधी पक्षनेते सिद्दरामय्या, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी विधान परिषदेवर निवडून आलेले नूतन सदस्य चन्नराज हट्टीहोळी, सलीम अहमद आणि हानगलचे आ. श्रीनिवास माने यांचा सत्कार केला. यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते एस. आर. पाटील, माजी उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर, ज्येष्ठ काँग्रेस नेते रमेशकुमार, एच. के. पाटील, सी. एम. इब्राहिम, बी. के. हरिप्रसाद आदी उपस्थित होते.



Recent Comments