बेळगावमध्ये सोमवारी हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांनी सुवर्णसौधला घेराव घालण्याचा प्रयत्न केला आहे. पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांचा संघर्ष मोठ्या प्रमाणात पेटलेला यावेळी दिसून आला.

राज्य सरकारने जारी केलेले कृषी कायदे रद्द करण्याच्या आग्रहास्तव कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसीरू सेनेचे राज्याध्यक्ष कोडीहळ्ळी चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली सुवर्णसौधला घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आला.
सोमवारी सकाळी १० वाजता बेळगाव तालुक्यातील हिरेवागेवाडी टोलनाक्यापासून शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. बसवेश्वर मूर्तीला पुष्पहार अर्पण करून पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. यानंतर सर्व शेतकरी बांधवांनी सुवर्णसौधकडे आगेकूच करत सुवर्णसौधला घेराव घालण्याचा प्रयत्न केला.


Recent Comments