Vijayapura

मंगळूरमध्ये धर्मांतराचा प्रयत्न : प्रमोद मुतालिक यांनी व्यक्त केला संताप

Share

मंगळूरमध्ये मुस्लिम धर्मांतराचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती उघडकीस आल्यानंतर सदर प्रकारावर विजापूरमध्ये श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी कि, हिंदू कुटुंबातील चार जणांचा या धर्मांतरामुळे आत्महत्येला सामोरे गेले आहेत. मंगळूरमधील बागलकोटे जिल्हा बिळगी येथील हिंदू कुटुंबातील चौघांचा धर्मांतराच्या प्रकरणात मृत्यू झाला आहे. सदर चारही सदस्यांनी आत्महत्या केली असून या प्रकरणी नूरजहान नामक व्यक्तीवर धर्मांतराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नूरजहान याच्यावर धर्मानंतरसह खुनी खटला दाखल करण्यात यावा, अशी मागणी प्रमोद मुतालिक यांनी केली आहे.

आत्महत्या करण्यासाठी भाग पाडलेल्या नूरजहान याच्यावर चारही जणांच्या खुनाचा खटला दाखल करावा, सदर व्यक्तीची संपूर्ण चौकशी करून प्रकरणाचा तपास करावा, यामागे असलेल्या रॅकेटचा पर्दाफाश करावा यासह धर्मांतर विरोधी कायदा अंमलात आणावा, असा आग्रह प्रमोद मुतालिक यांनी केला आहे. धर्मांतराच्या मुद्द्यावरून भाजप, जेडीएस आणि काँग्रेसमध्ये खेळ सुरु आहे. सरकारने धर्मांतराचे देशद्रोही कृत्य थांबवावे असा आग्रहदेखील मुतालिक यांनी केला आहे.

Tags: