Belagavi

विधिमंडळ अधिवेशनासाठी तगडा पोलीस बंदोबस्त !

Share

बेळगावातील सुवर्णसौधमध्ये सोमवारपासून सुरु होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या सुरक्षेसाठी हजार पोलिसांचा बंद फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. एक पोलीस आयुक्त, डीसीपी, ३५ डीवायएसपी, १०० सीपीआय आणि २५० पीएसआय असा तगडा बंदोबस्त असणार आहे.

अधिवेशनात भाग घेणाऱ्यांसाठी विधिमंडळ सचिवालयाच्या आदेशानुसार, बेळगाव जिल्हा प्रशासनाने संबंधितांनी कोरोना लशीचे २ डोस घेतलेले तसेच ७२ तासांच्या आतील आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट असणे बंधनकारक केले आहे. अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी ४ हजारहून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. बेळगाव शहर पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली २ डीसीपी, ३५ डीवायएसपी, १०० सीपीआय आणि २५० पीएसआय असा तगडा बंदोबस्त असणार आहे. बंदोबस्तासाठी येणाऱ्या पोलिसांच्या निवासासाठी यंदा प्रथमच जर्मनीच्या धर्तीवरील मेक इन टाऊनशिप उभारण्यात आली आहे.

यात ३ टेंटमध्ये १८०० पोलिसांच्या बेड्सची व्यवस्था असेल. पुरुष पोलीस व पीएसआयसाठी या टाऊनशिपमध्ये राहण्याची व्यवस्था आहे. त्याशिवाय सांबरा येथील एअरमन ट्रेनिंग स्कुलमध्ये ५०० आणि कॅम्पमधील मराठा इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये ५०० पोलिसांच्या राहण्याची व्यवस्था केली आहे. एकंदर अधिवेशनासाठी येणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची निवास-भोजन व्यवस्था चोख व्हावी याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष दिले आहे.

 

 

Tags: