हानगल विधानसभा पोटनिवडणुकीच्या पुनरावृत्ती बेळगाव विधान परिषदेत घडेल आणि काँग्रेस उमेदवारच निवडून येईल असा विश्वास बेळगाव ग्रामीणच्या आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केला.

विधान परिषद निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आ. लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, केपीसीसी कार्याध्यक्ष आ. सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नेत्यांनी संघटितपणे प्रचार केला आहे. जिल्ह्यातील सर्व १४ तालुक्यांत काँग्रेसचे मतदार, समर्थक व हितचिंतक आहेत. त्यामुळे काँग्रेस उमेदवार पहिल्या फेरीतच निवडून येईल अशी अपेक्षा आहे.
निवडणुकीदिवशी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई बेळगावात येऊन गेल्याचा निवडणुकीवर काही परिणाम होईल का या प्रश्नावर, मुख्यमंत्री जसे बेळगावात येऊन गेलेत तसेच विरोधी पक्षनेते सिद्दरामय्या, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमारही बेळगावात येऊन गेले आहेत. परंतु मतदारांवर कोणाचा प्रभाव पडतो हे महत्वाचे आहे. आमच्यामते हानगल निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीतही निकालाची पुनरावृत्ती होईल.
दरम्यान, कोणी कितीही विजयाचे वादे-प्रतिवादे केले तरीही विजयी कोण होणार हे १४ डिसेंबरलाच समजणार आहे.


Recent Comments