नेपाळमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत भारतीय संघाने विजय मिळवला. या संघातील खेळाडू बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडीचा दिलीप सद्रोद्दीन मुजावर याचा जय कर्नाटक जनपर वेदिकेतर्फे सत्कार करण्यात आला.

बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडीचा सुपुत्र दिलीप सद्रोद्दीन मुजावर याने बेळगावचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर रोशन केले आहे. नेपाळमध्ये झालेल्या कबड्डी स्पर्धेत भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवला. त्यात दिलीप मुजावरने चांगले प्रदर्शन केले. त्याबद्दल त्याचा मंगळवारी गावात जय कर्नाटक जनपर वेदिकेतर्फे शाल घालून, फेटा बांधून सत्कार करण्यात आला. 
सत्काराला उत्तर देताना दिलीप मुजावर याने सांगितले की, स्पर्धेत भाग घेण्यासाठी नेपाळला जाण्यात मला अनेक अडचणी आल्या. त्यावेळी जय कर्नाटक जनपर वेदिकेचे अध्यक्ष इरफान अत्तार तसेच इतरांनी मोठी मदत केली. त्यामुळेच मी नेपाळला जाऊन भारतीय संघाच्या विजयात वाटा उचलू शकलो. त्याबद्दल मदत केलेल्या सर्वांचा मी ऋणी आहे.
यावेळी केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील, जय कर्नाटक जनपर वेदिकेचे अध्यक्ष इरफान अत्तार, मानव हक्क समितीचे राज्याध्यक्ष सुधीर संभाजी, काँग्रेस जिल्हा सरचिटणीस प्रदीप एम. जी., मंजू, दीपक आदी उपस्थित होते.


Recent Comments