बेळगावातील जगज्योती बसवेश्वर कल्याण मंदिर ट्रस्ट आणि वीरशैव लिंगायत महासभेच्या वतीने कार्तिक मासानिमित्त सत्संग कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

बेळगावातील हट्टीहोळ गल्ली, शहापूर येथील श्री दानम्मादेवी मंदिरात जगज्योती बसवेश्वर कल्याण मंदिर ट्रस्ट आणि वीरशैव लिंगायत महासभेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सत्संग कार्यक्रम भक्तिभावाने पार पडला. कारंजीमठाचे श्री गुरुसिद्ध महास्वामी यांच्या सानिध्यात हा सत्संग कार्यक्रम पार पडला. यावेळी भारती मठद यांनी सत्संगात व्याख्यान देऊन मार्गदर्शन केले. त्यानंतर कारंजीमठाचे श्री गुरुसिद्ध महास्वामी यांचे आशीर्वचन झाले.
यावेळी रत्नप्रभा बेल्लद, चंद्रशेखर बेंबळगी, जगज्योती बसवेश्वर कल्याण मंदिर ट्रस्ट आणि वीरशैव लिंगायत महासभेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments