Belagavi

वेगळ्याच तेजाने झळाळून गेले कपिलेश्वर मंदिर !

Share

 अंधाराला पळवून लावत शेकडो दिव्यांनी लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया कपिलेश्वर मंदिराच्या प्रांगणात शनिवारी सायंकाळी अवतरली. निमित्त होते कार्तिक मासानिमित्त आयोजित केलेल्या कार्तिकोत्सवाचे !

होय, दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगावचे आराध्य दैवत कपिलेश्वर मंदिर शनिवारी सायंकाळी एका वेगळ्याच तेजाने झळाळून गेले. भक्तांनी श्रद्धेने असंख्य दीप लावून मंदिरात कार्तिक दीपोत्सव साजरा केला. बेळगाव मनपाच्या मुख्य अभियंता लक्ष्मी निपाणीकर, सांबरा विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांची विशेष उपस्थिती यावेळी होती. याप्रसंगी कपिलेश्वराची विशेष पूजा करण्यात आली. अनेक भक्तांनी मंदिरात येऊन देवाचे दर्शन घेऊन दीप प्रज्वलित केले. त्यामुळे दिव्यांच्या प्रकाशात कपिलेश्वर मंदिर उजळून निघाले.

 

Tags: