Belagavi

विणकर समाजाच्या समस्यांसाठी विचारमंथन बैठक

Share

बेळगावात विणकर महासंघातर्फे राज्यस्तरीय विचारमंथन संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बेळगाव उद्यमबाग येथील फौंड्री क्लस्टर येथे रविवारी झालेल्या कार्यक्रमात विणकरांच्या समस्येवर विचारमंथन करण्यात आले.

यावेळी बोलताना विणकर समाजातील ज्येष्ठ नागरिक शंकर बुचडी म्हणाले, सध्या मोठ्या प्रमाणात व्यवसायावर वाईट परिस्थिती आली आहे. अनेक व्यावसायिक मोठमोठ्या समस्यांना सामोरे जात आहेत. हा व्यवसाय राखण्यासाठी आणि अधिकाधिक जनतेपर्यंत व्यवसाय पोहोचविण्यासाठी सरकारने अनेक सुविधा लागू केल्या आहेत. महाराष्ट्रातील विणकरांच्या मुलांना २ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आजूबाजूच्या राज्यांप्रमाणे कर्नाटकात देखील सर्व सुविधा मिळाल्यास कर्नाटकातील विणकरांची मुलेही शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी राज्य कापड गिरणी महासंघाचे उपाध्यक्ष राजशेखर सुरगावी, विणकर समाजाचे नेते रवींद्र कलबुर्गी, पांडुरंग कामकर, गजानन गुंजेरी, लोहित मोरकर आदींसह विणकर व्यावसायिक आणि नागरिक उपस्थित होते.

Tags: