हेस्कॉमच्या नेहरूनगर आणि वडगाव ११०/३३/११ केव्ही वीज वितरण केंद्राच्या कार्यक्षेत्रात तातडीचे दुरुस्ती व देखभाल कार्य करण्यात येणार असल्याने उद्या सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत बेळगाव शहरातील काही भागात वीजपुरवठा बंद राहणार आहे.

उद्या, रविवारी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत भाजी मार्केट, किल्ला, पाटील गल्ली, भांदूर गल्ली, ताशिलदार गल्ली, रविवार पेठ, अनंतशयन गल्ली, कुलकर्णी गल्ली, शेरी गल्ली, फुलबाग गल्ली, मठ गल्ली, कलमठ गल्ली, सर्किट हाऊस, सीबीटी परिसर, शेट्टी गल्ली, चव्हाट गल्ली, नाना पाटील चौक, दरबार गल्ली, जालगार गल्ली, कसाई गल्ली, कीर्ती हॉटेल, फॉरेस्ट ऑफिस, आरटीओ सर्कल, कोतवाल गल्ली, डीसीसी बँक, खडेबाजार, शीतल हॉटेल परिसर, माळी गल्ली, भेंडी बाजार पांगुळ गल्ली, मेनशी गल्ली, भोई गल्ली, कलईगार गल्ली, खंजर गल्ली, कचेरी रोड, काकतीवेस, रिसालदार गल्ली, नार्वेकर गल्ली, गवळी गल्ली, खडक गल्ली, भडकल गल्ली, अयोध्यानगर परिसर, जुने गांधीनगर, दीपक गल्ली, संकम हॉटेल परिसर, बागलकोट रोड, उज्वलनगर, न्यू गांधीनगर, अमन नगर, एससी मोटर्स परिसर, मारुती नगर, बडव्न कुडची, देवराज अरस कॉलनी या परिसरात वीज पुरवठा बंद राहणार असल्याचे हेस्कॉमच्या कार्यकारी अभियंत्यांनी कळविले आहे.


Recent Comments