बेळगावातील भूतरामनहट्टी येथील श्रीक्षेत्र मुक्ती मठाच्या सभागृहात ‘जनपर उत्सव–२०२१‘चे आयोजन करण्यात आले.

कन्नड आणि संस्कृती खात्याच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ‘जनपर उत्सव-२०२१’चे उद्घाटन कर्नाटक राज्योत्सव पुरस्कार विजेते सक्रेप्पा पात्रोटी यांनी केले. शिवसिद्ध सोमेश्वर शिवाचार्य महास्वामींच्या सानिध्यात हा कार्यक्रम झाला. प्रा. वाय. बी. हिम्मडी, कन्नड आणि संस्कृती खात्याच्या सहायक संचालिका विध्यावती बजंत्री यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध कलापथकांनी कला सादर करून उपस्थितांचे मन जिंकले.



Recent Comments