महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील श्री क्षेत्र गुड्डापूर यात्रेच्या निमित्ताने हजारो भक्तांनी पदयात्रेमध्ये सहभाग घेतला. या यात्रेत केवळ महाराष्ट्रच नाही तर कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील भक्तदेखील उत्साहाने पदयात्रेत सहभाग घेतात.

विजापूर जिल्ह्यातील तालुका आणि गावातील भक्तांनी या पदयात्रेत सहभाग घेतला. कोविडच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या पदयात्रेत भक्तांची संख्या थोडी कमी असल्याची जाणवली. सकाळच्या थंडीत आपल्या खांद्यावर बॅग्स घेऊन उत्साहात हे भक्त पदयात्रेत सामील झाल्याचे दिसून आले. दानम्मादेवीच्या जयघोषात भाविकांनी भक्तिपूर्ण वातावरणात पदयात्रेत सहभाग नोंदवला. 
पदयात्रेची अनेक संघ संस्थांनी भक्तांच्या सेवेसाठी पिण्याच्या पाण्याची आणि अल्पोपहाराची व्यवस्था केली होती. कोविड पार्श्वभूमीवर यंदा संघ संस्थांनी छोट्या प्रमाणात प्रसादाची व्यवस्था केली होती. गुड्डापूर येथे अमावास्येनिमित्त होणाऱ्या कार्तिकोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हि पदयात्रा आयोजित करण्यात येते. या पदयात्रेत सहभागी झालेल्या भक्तांसाठी इन न्यूजच्या वतीनेही अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. विजापूर येथील प्रतिष्ठित शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिवाजी गायकवाड, सुरेश बिरादार, प्रदीप जैन तसेच
साहित्यिक श्रीरंग पुराणिक, पत्रकार गुरुराज गद्दनकेरी सुनील भास्कर यांच्या हस्ते अल्पोपहार वितरणाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी इन न्यूजचे विजापूर जिल्ह्याचे पत्रकार विजयकुमार सारवाड आणि प्रतिष्ठित शिक्षण संस्थेच्या रवींद्रनाथ टागोर शाळेच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते अल्पोपाहाराचे वितरण करण्यात आले. १० हजार पाण्याच्या बाटल्या, ५ हजार भडंगची पाकिटे वितरित करण्यात आली.


Recent Comments