Belagavi

‘नकुल’ या सिंहाचा मृत्यू किडनीफेल आणि हार्ट अटॅकने : आ. सतीश जारकीहोळी

Share

भूतरामनहट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयातीलनकुलया सिंहाचा काल मृत्यू झाला. यासंदर्भात बोलताना केपीसीसी कार्याध्यक्ष . सतीश जारकीहोळी यांनी, अनेक प्रयत्नानंतरही सिंहाला वाचवता आले नाही. किडनीफेल आणि हार्ट अटॅकने सिंहाचा मृत्यू झाल्याचे सांगितले

शुक्रवारी बेळगावातील काँग्रेस भवनात पत्रकारांशी बोलताना आ. सतीश जारकीहोळी म्हणाले, नकुल या सिंहाला किडनी आणि हृद्यविकाराचा त्रास होता. गेल्या ३-४ महिन्यांपासून त्याच्यावर उपचार करण्यात येत होते. बन्नेरघट्ट, गदग आणि म्हैसूर येथील पशुतज्ज्ञांना आणून याच्यावर उपचार केले होते. मात्र उपचार यशस्वी न झाल्याने त्याला वाचविता आले नाही.

भूतरामनहट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयात वृद्ध प्राण्यांना पाठवले जात असल्याच्या आरोपावर प्रतिक्रिया देतं आ. जारकीहोळी म्हणाले, शक्य तितक्या कमी वयाचे प्राणी पाठवा असे सांगितलेले असते. कोविड आणि पावसामुळे थोडी समस्या निर्माण झाली आहे. लवकरच आणखी काही प्राणी आणण्यात येतील. किमान निम्मे आयुष्य शिल्लक असलेले प्राणी पाठवण्यास सांगितले आहे.

उत्तर कर्नाटकाला जशा केएसआरटीसीच्या खटारा बस पाठवल्या जातात तसे म्हातारे प्राणी पाठविण्यात येत आहेत का? या पत्रकारांच्या प्रश्नावर आ. सतीश जारकीहोळी यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली. सिंह सिंहच असतो, त्याच्यासमोर गेले म्हणजे कळते. तरुण काय अन म्हातारा काय? दोघेही एकाच प्रकारे रिऍक्ट करतात असे त्यांनी सांगितले.

 

 

Tags: