Belagavi

हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम तत्काळ थांबवा : कोडीहळ्ळी चंद्रशेखर

Share

हलगामच्छे बायपास रस्त्याच्या कामामुळे सुपीक जमीन गमावून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची शेतकरी नेते कोडीहळ्ळी चंद्रशेखर यांनी भेट घेऊन विचारपूस केली

बेळगाव तालुक्यातील हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या कामामुळे सुपीक जमीन गमावून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची शेतकरी नेते कोडीहळ्ळी चंद्रशेखर यांनी भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी शेतकरी कुटुंबातील महिलांनी कोडीहळ्ळी चंद्रशेखर यांच्या पाया पडून संकटातून सुटका करण्याची विनंती केल्याचे डोळ्यात पाणी आणणारे दृश्य पहायला मिळाले.

या संदर्भात बोलताना कोडीहळ्ळी चंद्रशेखर म्हणाले, झिरो पॉईंट निश्चित न करताच अवैज्ञानिक पद्धतीने हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम बेकायदेशीरपणे करण्यात आले. सरकारने ४/१ आणि ६/१ प्रमाण निर्धारित केले नाही. शिवाय बेकायदा कामाला सरकार पोलीस संरक्षण पुरवत आहे आणि पोलीस शेतकऱ्यांवरच दडपशाही करत आहेत. ही कसली लोकशाही आहे? असा सवाल करून पोलिसांनी शेतकऱ्यांवर दडपशाही करू नये आणि सरकारने तत्काळ काम थांबवावे अशी मागणी कोडीहळ्ळी चंद्रशेखर यांनी केली.

दरम्यान, बायपास रस्त्याचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून न्यायालयाचा निर्णय काय येतो हे पहावे लागेल.

 

 

Tags: