बेळगावात २ वर्षानंतर होणारे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पाहण्याची शालेय विध्यार्थ्यांची संधी कोविडने हिरावून घेतली आहे.

होय, कोविडमुळे यंदा शालेय विध्यार्थ्यांना अधिवेशनाचे कामकाज पाहण्याची संधी शालेय विध्यार्थ्यांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून न देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. विधानसभाध्यक्ष विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी गुरुवारी बेळगावात पत्रकाराना ही माहिती दिली. सुवर्णसौधमध्ये १३ ते २४ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी बेळगावात सभापती कागेरी यांनी अधिकाऱ्यांची आज सभा घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, दरवेळी अधिवेशनाचे कामकाज पाहण्यासाठी शालेय विध्यार्थ्यांना परवानगी देण्यात येत होती. मात्र आरोग्यहिताच्या दृष्टीने कोविडमुळे यावेळी विध्यार्थ्यांना परवानगी देण्यात येणार नाही. केवळ मोठ्यांना अधिवेशन पाहता येईल. 

२०१८ नंतर पुन्हा बेळगावात अधिवेशन घेण्यात येत आहे. यावेळीही अधिवेशन घेण्याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कोरोनाचे संकट पुन्हा उभे ठाकले आहे. सर्व तयारी करून सर्व खबरदारी घेत अधिवेशन घेण्यात येईल. अवकाळी, अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि जनता संकटात आहे. अधिकाऱ्यांवरही जबाबदारीही वाढली आहे. ती पेलण्याचा प्रश्नही आहेच. त्याशिवाय विधान परिषद आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूका आहेत. बेळगाव जिल्हा प्रशासनावरही जबाबदारी वाढली आहे. निवास, भोजन आणि वाहतुकीशी संबंधित सर्व व्यवस्था करण्यात आली आहे असे विधानसभाध्यक्ष विश्वनाथ हेगडे-कागेरी यांनी सांगितले.
विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी म्हणाले, दोन्ही सदनात विरोधी पक्षांनी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग न करता अधिवेशनाचे कामकाज यशस्वी कसे होईल हे पहावे. अधिवेशनात गोंधळ न घालता सकारात्मक चर्चेवर भर द्यावा. विधान परिषद सदस्यांचा कालावधी ५ जानेवारी २०२२ पर्यंत आहे. त्यामुळे त्यांनीही अधिवेशनात भाग घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी उपसभापती आनंद मामनी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments