भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने बेळगावमध्ये ६ डिसेम्बरपासून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने एकता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भारतीय बुद्ध महासभेच्या वतीने देण्यात आली आहे।

आज सकळै १०-३० वाजता सदाशिव नगर येथील बौद्ध मठात झालेल्या पूर्वतयारी बैठकीत हि माहिती देण्यात आली आहे। यासंदर्भात भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष यल्लाप्पा कांबळे बोलताना म्हणाले, बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। धर्मवीर संभाजी चौकापासून कँडल मार्च चे आयोजन करण्यात आले असून विविध कार्यक्रमचेही आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी प्रा. के. डी. मंत्रेशी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष यशवंत सम्राट, सचिव शेखर शिंगे, खजिनदार वाय पी गाडीनायक , समता सैनिक दलाचे दीपक मेत्री, दलित नेते मल्लेश चौगुले आदींसह इतर उपस्थित होते.


Recent Comments