Vijayapura

दुसऱ्या लग्नाला विरोध केल्याने पत्नीवर खुनी हल्ला

Share

दुसऱ्या लग्नाला विरोध केल्याने एकाने पत्नीवर खुनी हल्ला केल्याची घटना विजापूर जिल्ह्यातील बबलेश्वर तालुक्यातील बेल्लूब्बी येथे घडली.

शीला गोपाळ हरिजन असे पतीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. शीलाचा पती गोपाळ याला दुसरे लग्न करायचे होते. पण त्याला शीलाचा विरोध होता. या रागातूनच गोपाळने शीला शौचाला गेली असता तिच्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यात शीलाच्या चेहऱ्यावर आणि मानेवर गोपाळने अनेक वार केले. त्यामुळे ती गंभीर जखमी झाली आहे.

तिच्यावर विजापूर जिल्हा इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. घटनेनंतर पती गोपाळ फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. बबलेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 

Tags: